Railway News: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; २० एक्स्प्रेसना कल्याण, कर्जत, कसारा, लोणावळा स्थानकांत थांबा

Central Railway News : जवळपास २० पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा, पनवेल, लोणावळा आणि कल्याण स्थानकांवर थांबणार आहेत.
Railway News
Railway NewsSaam Tv
Published On

20 Passenger Trains Halts At Central Railway Stations : लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास २० पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेवरील कर्जत, कसारा, पनवेल, लोणावळा आणि कल्याण स्थानकांवर थांबणार आहेत.

मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा मुंबई आणि महानगरांतून नियमित प्रवास करणाऱ्या अंदाजे २५ हजार प्रवाशांना लाभ होणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रवासी संघटनांच्या बैठका झाल्या होत्या. तसंच वारंवार हा मुद्दा उचलून धरल्यानं मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर या लांबपल्ल्यांच्या ट्रेनना थांबा देण्यात येणार आहे.

Railway News
Jai Jawan Govinda Pathak: गोविंदा आला रे आला... जोगेश्वरीचा राजा इतिहास घडवणार! यंदा जय जवानचे १० थर लागणार का?

कोविड १९ महामारीच्या काळात या लांबपल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दोन वर्षे उलटून गेली तरी, ही सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. या स्थानकांवर २० ट्रेनना पुन्हा थांबा दिला जावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आग्रही होत्या.

गेल्या दोन वर्षांत या स्थानकांवर लांबपल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी मागणी होती. त्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत जवळपास पाच ते सहा बैठकाही झाल्या होत्या. आता या स्थानकांवर थांबा देण्यात आल्यानं आम्ही आनंदी आहोत, अशी माहिती कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र विशे यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिली.

रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी त्या-त्या भागातील प्रवाशांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाबाबत माहिती दिली. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली, असेही त्यांनी सांगितले.

Railway News
Mumbai Crime News : पोलिसालाच गंडवले; मुलाला रेल्वेत नोकरी देण्याची बतावणी, आरोपी ४ वर्षांनी अडकला 'जाळ्यात'

कोणकोणत्या एक्स्प्रेसना कुठे थांबा?

कर्जत रेल्वे स्थानक

11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस

11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्स्प्रेस

लोणावळा रेल्वे स्थानक

11027 दादर-पंढरपूर एक्स्प्रेस

11028 पंढरपूर-दादर एक्स्प्रेस

11041 दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस

11042 साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस

17317 हुबली-दादर एक्स्प्रेस

Railway News
Mhada Lottery News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 1 लाख घरांसाठी निघणार लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

17318 दादर-हुबळी एक्स्प्रेस

17412 कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस

18519 विशाखापट्टणम-LTT एक्स्प्रेस

18520 LTT-विशाखापट्टणम एक्स्प्रेस

पनवेल रेल्वे स्थानक

12223 LTT-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस

12224 एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस

कसारा रेल्वे स्थानक

18029/30 LTT शालिमार एक्स्प्रेस

17617/18 सीएसएमटी नांदेड तपोवन एक्स्प्रेस

12071/72 सीएसएमटी जालना जनशताब्दी एक्स्प्रेस

13202 LTT पाटणा एक्स्प्रेस

12109/10 सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

17611/12 सीएसएमटी नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com