
दहीहंडी हा सन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा ६ सप्टेंबर रोजी दहीहंडी हा सन साजरा केला जाणार आहे. दहीहंडी हा सन, जोगेश्वरीचा राजा आला.. जय जवान.. हे गाणं कानावर आल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.
मुंबई उपनगरातील जय जवान गोविंदा पथकाने गेल्या २३ वर्षांत अनेक मोठ मोठे रेकॉर्ड रेकॉर्ड केले आहेत.
मात्र एक रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे,तो म्हणजे १० थर लावण्याचा विक्रम. यंदा जय जवान गोविंदा पथक १० थर लावून इतिहास रचणार का? जाणून घ्या काय म्हणाले जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप धवले. (Latest news in marathi)
जय जवान गोविंदा पथकाने गेल्या २ महिन्यांपासूनच दहीहंडीसाठी सरावाला सुरुवात केली आहे. यंदा त्यांचं लक्ष केवळ आणि केवळ १० थर लावण्याचा रेकॉर्ड मोडण्यावर असणार आहे. जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप धवले यांनी साम डिजिटलचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, '१० थर लावण्याची अपेक्षा आम्ही २०१० सालापासून करतोय. २०१० ला आमचा पहिला प्रयत्न अयशस्वी गेला, २०१९ ला प्रयत्न केला तो अयशस्वी ठरला. त्यानंतर २०२२ ला प्रयत्न केला तो देखील अयशस्वी ठरला आहे. एकंदरीत आमच्यातील काही कमतरता आहेत त्या आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. जोगेश्वरी आई,बजरंगबली आणि खेळाडूंच्या आई-वडिलांचे आशिर्वाद आमच्यासोबत आहेत. त्यामुळे नक्कीच १० थर साकारण्याचा आम्ही प्रयत्न करू.'
१० थर लावून करणार स्पेनच्या पथकाची बरोबरी.. .
जय जवान गोविंदा पथक यंदा १० थर लावून स्पेनच्या गोविंदा पथकाची बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. सध्या मानवी मनोरे रचून १० थर लावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्पेनच्या कास्टेलर्स दे बार्सिलोनाच्या नावावर आहे.
या पथकाने एकावर एक मानवी मनोरे रचून १० थर लावले होते. आता जय जवान गोविंदा पथक पून्हा एकदा या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मात्र जय जवान गोविंदा पथकाकडे भारतात पहिले १० थर लावण्याचा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.
सरावादरम्यान केलाय नवा रेकॉर्ड....
जय जवान गोविंदा पथकानं चक्क २ तासात तब्बल ५ वेळा नऊ थर लावले आहेत. ही किमया त्यांनी २६ ऑगस्टला सरावादरम्यानच करुन दाखवली आहे. इतकचं काय तर यावर्षी त्यांनी आगळा वेगळा रेकॉर्डच करुन दाखवला आहे. २०२३च्या प्रॅक्टीस दरम्यान जय जवान गोविंदापथकानं तब्बल ११ वेळा नऊ थरांची कडक सलामी देत नवा आणि दणदणीत विक्रम रचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.