Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte SaamTvnews

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका, दोन वर्ष वकिली करता येणार नाही

Gunratna Sadavarte News : वकील सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे तक्रार केली होती.
Published on

सचिन गाड

Mumbai News : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसला आहे. राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सदावर्ते यांना दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. (Latest Marathi News)

Gunratna Sadavarte
Rahul Gandhi Vs Smriti Irani : नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींचे टार्गेट, पण मोदींचे टार्गेट...; स्मृती इराणी कडाडल्या

एसटी कर्मचारी संपादम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी बार काऊन्सिलने वकिलांना घालून दिलेली शिस्तीची नियमावली वारंवार मोडली होती. अशी तक्रार पिंपरी चिंचवड शहरातील ख्यातनाम वकील सुशील मंचरकर यांनी बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कडेकेली होती.

Gunratna Sadavarte
Pune News : पैशांपुढे मैत्री हरली! कट रचून डोक्यात हातोडा घालत मित्राला संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

एसटी कर्मचारी संपादरम्यान गुणरत्न सदावर्ते हे सार्वजनिक ठिकाणी वकिलांचा ड्रेस कोड घालून फिरत होते. सार्वजनिक ठिकाणी वकिलांनी वकिलांचा गाऊन घालून सहभागी होऊ नये. अशी वर्तवणूक नियमावली बार काऊन्सिलने देशातील सर्व वकिलांना घातली आहे. त्या वर्तवणूक नियमावलीचे उल्लंघन सदावर्ते यांनी वारंवार केल्यामुळे त्यांची सनद दोन वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती तक्रारदार अॅड. सुशील मंचरकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com