

संजय गडदे
Mumbai Crime News : फिल्म कलाकार धर्मेश व्यास यांची 1 लाख रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पासपोर्ट डिस्पॅच करण्याच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे. मात्र, धर्मेश यांनी वेळेत तक्रार केल्याने गोल्डन अवरमध्ये फसवणूक झालेली सर्व पैसे परत मिळवून देण्यास ओशिवरा पोलीसांच्या सायबर सेलला यश मिळाले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार धर्मेश जय किशोर व्यास यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन कॉल आला होता. तुमचा पासपोर्ट आला आहे. मात्र डिस्पॅच करण्यासाठी चा कोड ब्लॉक करण्यात आला आहे. तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील. यानंतर तुमचा पासपोर्ट दोन तासात तुमच्या घरी पोहोचेल असे समोरील व्यक्तीने फोनवर सांगितलं.
मात्र, धर्मेश व्यास हे चित्रपटाच्या चित्रीकरणांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीच्या नंबर वर पाच रुपये पाठवले. मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण 99,999/- रु. वजा झाल्याचा मेसेज प्राप्त झाला.
तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांच्या बँकेची संपर्क करून त्यांच्या खात्यातून रक्कम वजा झाल्याचे सांगितले. तेव्हा बँकेने त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे सांगितले. तेव्हा तक्रार यांना त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
तक्रारदार धर्मेश व्यास हे त्यांची ऑनलाइन फसवणूक केल्याबाबतची तक्रार घेऊन ते समक्ष पोलीस (Police) ठाण्यास गेले. त्यानंतर त्यांच्या तक्राराची तात्काळ दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे येथे आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे, वपोनि सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी दिगंबर कुरकुटे,अशोक कोंडे,विक्रम सरनोबत यांनी तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे एचडीएफसी बँकेच्या मॅनेजरशी संपर्क साधला.
त्यांनंतर तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम ही IDFC Fast बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याने नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार केले. त्यानंतर तात्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम 99,999/-रु. गोठविण्यात यश प्राप्त झाले. रक्कम व्यास यांना करण्याची बँकेमार्फत प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.