Pune Political News : प्रेमभंग झाल्याने दर्दी आशिक भडकला; बड्या नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

Pune News : राजकिय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
Pune Political News
Pune Political NewsSaam Tv
Published On

सचिन जाधव

Pune News : पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, मनसे नेते वसंत मोरे आणि पीएमसी माजी नगरसेवक अविनाश बागवे या राजकिय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील घोरपडी परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान शेख असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती पुण्यातील बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यांकडून खंडणी मागत होता. इम्रान शेख गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांच्या रडारवर होता. इम्रान हा एकतर्फी प्रेमातून मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना देत होता. केवळ आपल्या प्रियसीला त्रास देण्यासाठी इमरान हे सगळे प्रकार करत होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Pune Political News
Mumbai News: धक्कादायक! मंत्रालयामोर जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

नेमके प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड भाजप (BJP) शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना ३० लाख रुपयांच्या खंडणीचा मॅसेज आला होता. परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला होता. याबाबत महेश लांडगे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली होती.

काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘इलेक्शनला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी त्यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअ‍ॅप कॉलकरून देण्यात आली होती.

Pune Political News
Latur Accident News: भरधाव ट्रक गतिरोधकावरून उडाला अन्‌ थेट घरात घुसून झाला पलटी

कोण आहे हा आरोपी?

इम्रान शेख हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली. पण जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि काँग्रेसचे बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्यायाला पुन्ह अटक करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com