Mumbai News: धक्कादायक! मंत्रालयामोर जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

मंत्रालयासमोर जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Mantralaya
MantralayaSaam TV
Published On

सूरज सावंत

Mumbai News: मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मंत्रालयासमोर जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संगीता ढवरे असे मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे. ढवरे यांनी मंत्रालयासमोर विषारी द्रव्य प्यायले होते. (Latest Marathi News)

संगीता ढवरे यांनी मंत्रालयासमोर विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने मंत्रालयात परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर ढवरे यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याना लोणंद येथील रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले.

Mantralaya
Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांवर झालेल्या टीकेनंतर 'वर्षा'वरील पाहुणचारावर चाप; जेवणाच्या किंमतीत केला मोठा बदल

त्यानंतर ४ एप्रिल २०२३ रोजी ढवरे यांना पुण्यातील ससून रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ढवरे यांचा पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्याच्या (Pune) बंडगार्डन पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

संगीता ढवरे या महिलेचे पती हनुमंत ढवरे हे नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात जखमी महिलेच्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, याबाबत तक्रार नोंदवली होती.

यानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने त्यांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संगीता यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती.

Mantralaya
Eknath Shinde Ayodhya Visit: एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत; मुख्यमंत्री योगींचीही घेणार भेट, कसा असेल दौरा?

दरम्यान, संगीता यांच्याव्यतिरिक्त बीडमधील शीतल गादेकर आणि दिव्यांग रमेश मोहिते यांनी देखील जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. यामधील शीतल यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर रमेश मोहिते यांच्यावर उपचार सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com