

Aaditya Thackeray - Amit Thackeray : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट राज्य सरकारवर तुटून पडले असतानाच, ठाकरे बंधूंमध्येच शाब्दिक चकमक झडली. मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक गुरुवारी रात्री स्थगित करण्यात आली. तसं पत्रक मुंबई विद्यापीठाकडून काढण्यात आलं. यावरून राज्यातील राजकारण तापलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीका केली. (Latest Marathi News)
युवासेना या निवडणुकीत पुन्हा बाजी मारेल असे वाटल्याने निवडणूक स्थगित केली. हे सरकार डरपोक आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता. तर मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरत आहेत, अशी तोफही त्यांनी डागली होती.
सिनेट निवडणूक स्थगितीवरून राजकारण तापलं असतानाच, राज्य सरकारवर टीका करणारे आदित्य ठाकरे आणि मनविसेचे प्रमुख आणि राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यातच जुंपली आहे.
निवडणुकांच्या वेळी हे लपून बसतात आणि अशी स्थगिती मिळाल्यावर हे लोक बिळाच्या बाहेर पडतात. निवडणुकीत उतरावे. आपण सगळे पक्ष मैदानात उतरू. लोकांना ठरवू द्या, असं आव्हानच अमित ठाकरेंनी आदित्य यांना दिला.
अमित ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर आदित्य यांनीही प्रतिक्रिया दिली. मी काही लोकांवर बोलत नाही. निवडणूक स्थगित झाली. यांची तयारी नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्थगित होणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशाच प्रकारे हे लोकसभेच्या निवडणुकाही स्थगित करू शकतात. आपल्या देशात लोकशाही नाही असंच समजून पुढची वाटचाल होणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.