Letter To BDD Chawl Residents: 'सध्या काही समाजकंटकांची टोळी...'; आदित्य ठाकरेंचं बीडीडी चाळीतील रहिवाशांना पत्र

Aaditya Thackeray's Letter To BDD Chawl Residents: युवासेने नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना पत्र लिहिलं आहे.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray saam tv

निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray News: युवासेने नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना पत्र लिहिलं आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांशी पत्राच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी संवाद साधला आहे. 'सध्या काही समाजकंटकांची टोळी स्वत:ला काही कंत्राट मिळावीत म्हणून मराठी माणसांना ५०० चौ. फूटाचे चांगल्या दर्जाचे घर न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी संवाद साधताना केला आहे. (Latest Marathi News)

Aaditya Thackeray
Navi Mumbai MNS News: राज ठाकरेंना मोठा धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

आदित्य ठाकरे म्हणाले, 'गेली २५ वर्षे आपण या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहात. त्यामध्ये स्वतःची घरे भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत. खंत हीच वाटते की, जर हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल'.

'महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख माननीय श् उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढाकाराने मार्गी लागत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मी वरळीचा आमदार म्हणून सदैव आपल्या सोबत आहे, असेही ते म्हणाले.

Aaditya Thackeray
Mumbai Pune Express Way वर आजपासून अवजड वाहनांना बंदी

आदित्य ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे

नवीन नियोजनानुसार नागरीकांना केवळ ३ वर्षामध्ये डोळ्यादेखत नवीन घर मिळणार आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी रहिवाशानांत संक्रमण शिबीर अथवा बाहेर रू. २५,०००/- मासिक भाडे घेऊन रहावे लागणार आहे. (मासिक घरभाडे रु.२५,०००/- देण्याची जबाबदारी म्हाडाची असेल.) तर बाकीच्या रहिवाशांना बाहेर राहण्याची गरज नसून पेट नवीन घरामध्ये जाता येणार आहे.

वरळी बी.डी. डी. पुनर्विकास आराखडा रहिवाशांना माहितीकरीता पाहिजे असल्यास म्हाडा कार्यालयात उपलब्ध असून, जर आपणास आवश्यक वाटल्यास सामूहिक सादरीकरण म्हाडाच्या वतीने देखील करण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही शंका असल्यास त्यासाठी म्हाडा स्वतः सामुहिक बैठकांचे आयोजन करून आपल्या शंकेचे निरसन करेल आणि यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.

२००५ पासून जे. बी. डी. डी. मधील पोलीस बांधव त्यांच्या घराच्या मालकीसाठी लढत होते त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहून आम्ही माजी मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेव यांच्याच पुढाकारातून पूर्णत्वास नेले आहे. निवृत्त पोलिसांना सध्या आकारण्यात येणाऱ्या मासिक घरभाडे विषयीदेखील आपण विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले असून लवकरच त्यावर निर्णय येणे अपेक्षित • आहे व आपण यासाठी प्रयत्नशील आहोत.

Aaditya Thackeray
BJP-Congress Alliance : एकमेकांचे कट्टर विरोधक काँग्रेस-भाजप 'या' जिल्ह्यात एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा

त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला वरळी बी.डी.डी. प्रकल्प बनवणारे टाटा प्रोजेक्टस् ही (कंपनी केवळ विकासक अथवा कंत्राटदार म्हणून नाही तर ती एक सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. गेली २५ वर्षे आपण या पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहात, त्यामध्ये स्वतःची घरे भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत. खंत हीच वाटते की, जर हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री शिवसेनापक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पुढाकाराने मार्गी लागत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मी वरळीचा आमदार म्हणून सदैव आपल्या सोबत आहे.

धन्यवाद!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com