Mumbai Pune Express Way वर आजपासून अवजड वाहनांना बंदी

Heavy Vehicles Banned On Mumbai Pune Express way: आज महामार्गावर वाहनांची खूप गर्दी झाली हाेती.
Mumbai Pune Express Way News
Mumbai Pune Express Way News saam tv
Published On

Mumbai Pune Express Way News: सलग सुट्या आल्याने मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे बोरघाटात काही काळ वाहतूक धीम्या गतीने सुरु हाेती. दरम्यान या महामार्गावर उद्यापासून (रविवार) पर्यंत सोळा टन पेक्षा जास्त वजन असणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Mumbai Pune Express Way News
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : बंटी पाटील, बिंदू चौकात या ! अमल महाडिकांचं Open Challenge

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन ब्रिज दरम्यान वाहतुकीची समस्या उद्भवली हाेती.

बोरघाट वाहतूक पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई लेन ब्लॉक करून त्यावरून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना वळवले. कोणत्याही परिस्थितीत वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये म्हणून दस्तुरी बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने कौशल्य पणाला लावले. त्यांना आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल अशा यंत्रणांचे सहकार्य मिळाले.

Mumbai Pune Express Way News
Ratnagiri News : माजी आमदार संजय कदमांसह उद्धव ठाकरे गटाच्या २५ जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

दरम्यान उद्या (ता. 15 एप्रिल) दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार (ता. 16) रात्री अकरा वाजेपर्यंत सोळा टन पेक्षा जास्त वजन असणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, आणि नवी मुंबईकडे जाणारे सर्व भागातील रस्त्यांवर हा नियम लागू राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com