Goregaon Fire News: मुंबईत अग्नितांडव! दिंडोशीत भागात कपड्याच्या दुकानाला भीषण आग

Fire Caught in Mumbai's Dindoshi Area: मुंबईच्या दिंडोशीमधून आगीची घटना घडली आहे. दिंडोशी परिसरातील एका व्यापारी संकुलातील गारमेंट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
Fire Broke out at Dindoshi's Garment Shop
Fire Broke out at Dindoshi's Garment ShopSaam tv

Fire at Goregaon's Dingoshi:

मुंबईच्या दिंडोशीमधून आगीची घटना घडली आहे. दिंडोशी परिसरातील एका व्यापारी संकुलातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. दप्तरी रोडवरील सेंट्रल प्लाझा या व्यापारी संकुलातील गारमेंटला आग लागली. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai Fire) गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील एका व्यापारी संकुलातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. दप्तरी रोडवरील सेंट्रल प्लाझा या व्यापारी संकुलातील वर्धमान गारमेंट या दुकानाला आग लागली. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

Fire Broke out at Dindoshi's Garment Shop
Central Railway : मोठी बातमी! मध्य रेल्वेवर मुंबईहून कल्याणला जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

आग लागल्यानंतर इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच फायर इंजिन दोन टँकर एक रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपुरात एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग

नागपुरातील चौदा मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग लागली आहे. अमरावती रोडवरील १४ मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट दूरवरून दिसत आहे. या आगीवर अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन केंद्रातून तीन गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Fire Broke out at Dindoshi's Garment Shop
Best Places To Visit Near Mumbai | मुंबई जवळील या सर्वोत्तम हिलस्टेशनला नक्कीच भेट द्या!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com