Pune School : पुण्यातील CBSE बोगस शाळा प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा
Samarth Police Station
Samarth Police StationSaam Tv
Published On

Pune News : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले होते. या तिन्ही शाळांवर कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात विविधत कलमान्वये समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Samarth Police Station
Pune : पुण्यात CBSE बोर्डच्या तीन शाळा बोगस; शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा

बोगस शाळा कोणत्या?

एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

Samarth Police Station
Pune : शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा; पुण्यातील CBSEच्या आणखी 10 शाळा रडारवर

बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे. तसेच अजूनही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com