Pune : पुण्यात CBSE बोर्डच्या तीन शाळा बोगस; शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा

तुमची मुलं बोगस शाळेत शिकत नाही ना?
Pune
Pune

Pune News : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तब्बल 3 हून अधिक सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत. या तिन्ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Pune
Viral Video : मेडिकलमध्ये ORS घ्यायला घ्यायला गेला अन्..., हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

तसेच अजूनही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

बोगस शाळा कोणत्या?

एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी शाळांचे शासनाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपये मध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे.

Pune
Yogesh Kadam Accident : मी सुखरूप आहे, काळजी करू नका - आमदार योगेश कदम

या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी,प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली ते लावल जेणे करुन ज्यांची मान्यता आहे त्यांची मान्यता समोर येईल.आणि ज्यांची मान्यता नसेल ते देखील समोर येणार असल्याचं यावेळी औदुंबर उकिरडे यांनी सांगितल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com