गोड्या पाण्यातील वाघ! ८ फूट लांब, ३५ किलो वजन, मूळा-मुठा नदीतील 'महाशीर'चं लोणावळ्यात संवर्धन

Mula-Mutha River Mahseer Revival : टाटा पॉवरने लोणावळ्यातील वालवण केंद्रात ‘गोड्या पाण्यातील वाघ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर माशाच्या संवर्धनाचे ५५ वर्ष पूर्ण केले आहेत. या उपक्रमामुळे संकटग्रस्त मासा पुन्हा भारतीय नद्यांमध्ये दिसू लागला आहे.
Mahseer Fish Hatchery Lonavala
Mahseer Fish Hatchery Lonavala
Published On

Mahseer Fish Hatchery Lonavala गोड्या पाण्यातील वाघाचे म्हणजेच महाशीरचे संवर्धन लोणावळ्यात केलेय जात आहे. मागील ५५ वर्षांपासून मत्स्यप्रजनन केंद्रामार्फत टाटा पॉवरकडून माशांचे संवर्धन लोणावळ्यात होतेय. महाशीर हा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. त्याला "माशांमधील वाघ", खवल्या मासा म्हणूनही ओळखले जाते. या माशाला मासेमारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. गोड्या पाण्यातील ओठ जाड आणि त्यावर चार मिशा असतात. या माशांच्या निरनिराळ्या जातीत ओठांची ठेवण वेगवेगळी असते. पृष्ठपराच्या सुरुवातीला एक मजबूत काटा असतो. शेपटीचा पर दुभागलेला असतो.

गोड्या पाण्यातील वाघ’ म्हणून प्रसिद्ध असलेला 'महाशीर' हा जगातील सर्वात प्रसिद्ध २० गेम फिश प्रजातींपैकी एक आहे. या माशाची प्रथम ओळख १८४० च्या दशकात पुण्याजवळील मुळा-मुठा नदीत झाली. तब्बल ७–८ फूट लांबी आणि ३० ते ३५ किलो वजनापर्यंत वाढण्याची क्षमता असलेला आपल्या ताकदीसाठी आणि मासेमारीत येणाऱ्या आव्हानासाठी तो जगभरातील तो मत्स्यप्रेमींसाठी विशेष लोकप्रिय आहे.याचेच संवर्धन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून ओळख असलेल्या टाटा पॉवरकडून केले जातेय. विजेच्या पलीकडे जाऊन परिसंस्थेला बळकट करण्याचा कंपनीचा प्रयत्न म्हणजे 'महाशीर' संवर्धन उपक्रम. हा उपक्रम यंदा लोणावळ्यातील वालवण मत्स्यप्रजनन केंद्रात ५५ वर्षे पूर्ण करत आहे.

Mahseer Fish Hatchery Lonavala
Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

संकटातून संवर्धनाकडे

अनियंत्रित मासेमारी आणि अधिवास नष्ट होण्यामुळे महाशीरच्या संख्येत झपाट्याने घट झाली आणि या प्रजातीला जागतिक पातळीवरील निसर्ग संवर्धन संस्थेने (IUCN) ‘महाशीर’ला संकटग्रस्त म्हणून घोषित केले. या पर्यावरणीय धोक्याची जाणीव ठेवून टाटा पॉवरने १९७० च्या दशकात महाशीर संवर्धनाचा अनोखा प्रवास सुरू केला.

Mahseer Fish Hatchery Lonavala
Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

महाशीरची प्रजनन हंगाम मान्सूनच्या काळात (जून ते सप्टेंबर) असतो. या काळात प्रौढ माशांकडून अंडी गोळा केली जातात, त्यांचे फलन करून ती काळजीपूर्वक हॅचरीत ठेवली जातात. ७० ते ९६ तासांच्या आत, पाण्याच्या तापमानानुसार, या अंड्यांमधून लहान मासे (फ्राय) बाहेर येतात. हे लहान मासे वाढवून त्यानंतर राज्य मत्स्य विभागांच्या सहकार्याने देशभरातील नद्या आणि तलावांमध्ये सोडले जातात.

गेल्या अनेक वर्षांत टाटा पॉवरने महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांना मिळून २ कोटींहून अधिक महाशीर पिल्ले (फिंगरलिंग्स) सुपूर्द केली आहेत. या प्रयत्नांमुळे देशातील गोड्या पाण्याच्या परिसंस्थांचा समतोल पुनर्स्थापित झाला आहे आणि स्थानिक मत्स्य प्रजातींचा पुनरुज्जीवन घडून आला आहे.

Mahseer Fish Hatchery Lonavala
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

संशोधन, शिक्षण आणि समुदायाचा सहभाग

वालवण केंद्र आज संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षणाचे राष्ट्रीय केंद्र बनले आहे. देशभरातील विद्यार्थी, मत्स्य तज्ञ आणि संवर्धन कार्यकर्ते येथे अभ्यासासाठी भेट देतात. येथे महाशीरच्या जीवशास्त्रावर आणि प्रजननावर आधारित अनेक शास्त्रीय अभ्यास आणि पीएच.डी. संशोधन झाले आहे.

या उपक्रमात स्थानिक मच्छीमार समुदायांचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळे संवर्धन ही केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ बनली आहे. टाटा पॉवरच्या तज्ञ टीमने स्थानिक समाज आणि शैक्षणिक संस्थांसोबत मिळून विज्ञान, शाश्वतता आणि समावेशनाचा सुंदर संगम साधला आहे.

Mahseer Fish Hatchery Lonavala
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com