पुणे हादरले! 7 वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 40 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

7-Year-Old Girl Sexually Assaulted by 40-Year-Old Neighbor in Moshi: मोशी येथील विनायकनगरमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
The MIDC Bhosari Police Station where a case was registered against a 40-year-old man for sexually assaulting a minor girl in Moshi, Pimpri-Chinchwad.
The MIDC Bhosari Police Station where a case was registered against a 40-year-old man for sexually assaulting a minor girl in Moshi, Pimpri-Chinchwad.Saam tv
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

The MIDC Bhosari Police Station where a case was registered against a 40-year-old man for sexually assaulting a minor girl in Moshi, Pimpri-Chinchwad.
Ajit Pawar News | देवेंद्र फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार नाराज?

मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात फिर्यादीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून 40 वर्षीय व्यक्तीने या आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाने २ एप्रिलला सायंकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच कोणालाही सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली.

The MIDC Bhosari Police Station where a case was registered against a 40-year-old man for sexually assaulting a minor girl in Moshi, Pimpri-Chinchwad.
Pune Crime News: पुण्यात गुंडांचा धुडगूस.. पार्किंगमधील दुचाकी जाळल्या; वारजे परिसरातील धक्कादायक घटना

धक्कादायक बाब म्हणजे, ३ एप्रिलला सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी भोसरी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सोच्या अंतर्गत कलम ४, ६, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com