Pune Crime News: पुण्यात गुंडांचा धुडगूस.. पार्किंगमधील दुचाकी जाळल्या; वारजे परिसरातील धक्कादायक घटना

Pune Latest News: पुण्यामध्ये पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Latest News:
Pune Latest News:Saamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ करत दहशत माजवण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू असतानाच पुण्यामध्ये पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये (Pune) रस्त्यावर पार्किंगमधील दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वारजे भागातील रामनगर टाकी चौक परिसरात हा प्रकार घडला. समाजकंटकांकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या तीन दुचाकी पेटविण्यात आल्यात तर एका चारचाकी वाहनाची काच फोडून नुकसान करण्यात आले आहे.

गुरूवारी (१६, नोव्हेंबर) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या 2 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविली आहे. या घटनेवर योग्य कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली असून वारजे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Latest News:
Amravati News: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू, अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले

महिला डॉक्टरवर अत्याचार..

दरम्यान, मुंबई शहरामधून एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही, तर आरोपीने ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले. मुंबईच्या गावदेवी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. (Latest Marathi News)

Pune Latest News:
Baramati News: बारामती शहरात कडकडीत बंद; धनगर बांधवांच्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com