Pune Accident: शिवज्योत आणायला जाताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ शिवभक्तांचा जागीच मृत्यू

Pune Bike And Car Accident: विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना शिवभक्तांचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.
Pune Accident: शिवज्योत आणायला जाताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ शिवभक्तांचा जागीच मृत्यू
Pune AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भीषण अपघात

  • शिवजयंतीसाठी विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणायला निघालेल्या दोन तरुणांचा मृत्यू

  • भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली

दिलीप कांबळे, मावळ

शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणायला गेलेल्या शिवभक्तांवर काळाने घाला घातला. पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शिवज्योत आणायला जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही शिवभक्त गंभीर जखमी झाले आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नायगाव येथे हा भीषण अपघात झाला. शिवज्योत आणण्यासाठी भक्तिभावाने हे शिवभक्त निघाले होते पण वाटेत अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आंदर मावळातील हे शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दोघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला.

Pune Accident: शिवज्योत आणायला जाताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ शिवभक्तांचा जागीच मृत्यू
Accident: शिमगोत्सवादरम्यान भयंकर घडलं! कारखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू, अपघातावेळी खिडकीतून खाली पडला नंतर...

या अपघातामध्ये दोन्ही शिवभक्त गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. ओमकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या शिवभक्तांची नाव आहेत. ओमकार दत्ता आरडे शिंदेवाडीत राहत होता. काही क्षणांपूर्वी शिवज्योत आणण्याच्या उत्साहाने निघालेले हे दोघे तरुण क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. या शिवभक्तांच्या मृत्यूमुळे आंदर मावळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Accident: शिवज्योत आणायला जाताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ शिवभक्तांचा जागीच मृत्यू
Accident News : बीडमध्ये अपघाताचा थरार; ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात : १३ जण गंभीर जखमी

दरम्यान, पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण अपघात झाला. डहाणूच्या महालक्ष्मी उड्डाणपुलावर मध्यरात्री ही घटना घडली. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या कारने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी टळली असून कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला करून वाहतूक केली सुरळीत केली.

Pune Accident: शिवज्योत आणायला जाताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ शिवभक्तांचा जागीच मृत्यू
Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com