

Youth Suicide for Marriage: नांदेडमधील ऑनर किलिंगची भयानक घटना ताजी असतानाच ठाण्यातून आता हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुलाला गर्लफ्रेंडसोबत लग्न करायचे होते, घरच्यांनी त्याला २ वर्षे थांबण्यास सांगितले. तू १९ वर्षांचा आहे, आणखी २ वर्षे थांब.. त्यावर मुलाचा संताप अनावर झाला अन् आयुष्य संपवले. या घटनेनंतर ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालाची वाट पाहत आहेत. (Youth suicide cases related to love and family pressure in Maharashtra )
मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता. दोघांना लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने ही गोष्ट कुटुंबियांना सांगितली. पण कुटुंबीयांकडून त्याला २ वर्षे थांबण्यास सांगण्यात आले. तू अजूनही १९ वर्षांची आहेस, २१ वर्षांची होईपर्यंत थांब, असे कुटुंबाने त्याला सांगितले. हे ऐकताच त्या तरुणाला खूप वाईट वाटले. तो खचला अन् रागाच्या भरात त्याने गळफास घेतला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून याची नोंद करण्यात आली. कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे.
३० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. तरुणाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची नोंद अपघात म्हणून केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या आंतरजातीय ऑनर किलिंगनंतर प्रेम प्रकरणाच्या या घटनेने तरूणाईच्या मानसिक स्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्महत्या करण हा मार्ग असू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलसांच्या प्राथमिक तपासात या घटनेबाबत धक्कादायक कारण समोर आलेय. १९ वर्षांचा तरूण एका मुलीवर प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबतच लग्न करायचे होते. मुळचे झारखंडचे असणारे हे कुटुंब ठाण्यातील डोंबवलीमध्ये राहायचे. वय कमी असल्याने त्याला कुटुंबियांकडून २ वर्षे थांबण्यास सांगितले. पण त्याला ही गोष्ट खटकली अन् त्याने आयुष्य संपवले. दरम्यान, मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.