

सचिन जाधव
Pune University News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ वा पदवी प्रदान सोहळा शनिवारी म्हणजेच १ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात दुपारी अडीच वाजता होणार आहे. (Latest Marathi News)
या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्र सरकारच्या (Central Government) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. एप्रिल-मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण एक लाख २१ हजार २८१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. (Pune News)
यामध्ये पदवीचे ९३ हजार ९८३, पदव्युत्तर पदवीचे २६ हजार ४५४, पीएच.डीचे ४३८, एम.फिलचे ११ अशा विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. कुलपती यांच्या हस्ते १०७ सुवर्णपदके (३० विद्यार्थी आणि ४० विद्यार्थिनी) यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान सोहळ्यात, तर उर्वरित विद्यार्थ्यांना टपालाद्वारे पदवी त्यांच्या पत्यावर पाठविण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.