Beed Crime News: बीड जिल्ह्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर? लग्नाचा तगादा लावत तरुणाची अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण

Beed latest crime news: मुलीने लग्नाला नकार देताच पीडितेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.
crime News
crime NewsSaam tv

Beed Crime News: "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन छेड काढली. यावेळी मुलीने नकार देताच पीडितेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. बीडच्या चिंचाळा येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथील रहिवासी असणारा तरुण सुनील दत्ता राठोड हा गावातीलच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. यात 2 दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या घरासमोर येऊन, 'तू मला खूप आवडतेस, माझ्या सोबत लग्न कर किंवा पळून जाऊ', असे म्हणत हात धरला.

crime News
Pune Crime News: पुण्यात मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारी टोळी गजागाड; ६ जिल्ह्यांतील १० गुन्हे उघडकीस

'तू माझ्या सोबत नाही आलीस तर जीवे मारून टाकीन', असे म्हणत विनयभंग केला. याबाबत मुलीच्या वडिलांनी विचारणा केली असता सुनीलची आई सुमन, वडील दत्ता आणि भाऊ अनिल राठोड यांनी मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केली.

दरम्यान, याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील दत्ता राठोड यांच्यावर कलम 354,354 (ड) तर सुमन दत्ता राठोड, दत्ता मुन्ना राठोड व अनिल दत्ता राठोड यांच्यावर 324, 323, 504, 506, 34 भादंवि सह कलम 12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime News
Buldhana Crime News : २४ तासांपूर्वी बेपत्ता झाली होती ६ वर्षीय चिमुकली, जंगलातील भयंकर दृश्यानं चिखली हादरली

बीडमध्ये दोन लाखांच्या अमली पदार्थासह एकास अटक

बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे, एका शेतकऱ्याने मोसंबी बागेत व भईमुगाच्या शेतात अमली पदार्थाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यात पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल २० किलो अमली पदार्थ आढळले आहेत. यामध्ये दोन लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नवनाथ माने असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी दोघांविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com