Pune Crime News: पुण्यात मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारी टोळी गजागाड; ६ जिल्ह्यांतील १० गुन्हे उघडकीस

Crime News Update: टॉवर कंपनीच्या ३ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे उघडकीस आले आहे.
Pune Police
Pune Police Saamtv

Pune News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात रोज खून, कोयता गँगच्या दहशतीच्या बातम्या समोर येत असतानाच आता नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी चक्क मोबाईल टॉवर चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Pune Latest Marathi News Update)

Pune Police
Ajit Pawar Tweet: कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेत पुरती नाकाबंदी! अजित पवारांचं त्यांच्याच शैलीत ट्वीट

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात (Pune) चक्क मोबाईल टॉवर चोरणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बंद अवस्थेतील मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून १३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

तसेच राज्यभरातील सहा जिल्ह्यात दहा मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याचेही या टोळीकडून कबूल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये टॉवर कंपनीच्या ३ अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

Pune Police
Shivputra Sambhaji Mahanatya: शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या फ्री पासेस द्या, अन्यथा... पोलिस कर्मचाऱ्याची थेट आयोजकाला धमकी

या टोळीकडून सातारा, बीड, सांगली, पुणे, रायगड, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील १० मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याचे कबुल केले आहे. जी. टी. एल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे देशभरात असंख्य टॉवर आहेत. २००८ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर या टोळीने बनावट लेटरपॅड दाखवून चोरी करण्यास सुरूवात केली होती. (Pune Crime)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com