रूग्णालयातून उपचार घेऊन आली अन् एक्सप्रेसखाली स्वत:ला झोकलं, २० वर्षीय तरूणीचं टोकाचं पाऊल | Yavatmal

Young Woman Ends Life Under Train: बल्हारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेससमोर झोकून देऊन एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना वणी रेल्वे स्टेशनजवळ घडली असून, तिने आत्महत्या का केली, याचा शोध सुरूये.
Yavatmal
YavatmalSaam
Published On

यवतमाळच्या वणीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बल्हारशाह-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेससमोर झोकून देऊन एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वणी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली असून, तिने आत्महत्या का केली याचा शोध सुरू आहे.

मृत तरूणी अनेक दिवसांपासून आजारी होती. नुकतंच नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार घेऊन तिला घरी पाठवण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर एक्सप्रेससमोर झोकून देऊन तिने स्वत:चं आयुष्य संपवलं. या प्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

रश्मी धनराज पराते (वय वर्ष २०) असे मृत तरूणीचे नाव आहे. ही तरूणी शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी अनेक दिवसांपासून आजारी होती. नागपूर येथील एम्स रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. यानंतर तिला नुकतंच घरी पाठवण्यात आलं होतं. मात्र, घरी परतल्यानंतर एक्सप्रेससमोर उडी घेत तिने आयुष्य संपवलं.

Yavatmal
12th HSC Result : अभिनंदन! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

प्राथमिक माहितीनुसार, बल्हारशाह -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेससमोर झोकून देऊन तिने आयुष्य संपवलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Yavatmal
Pahalgam Attack : दहशतवाद्यांना मदत करणारा ठार, पोलिसांना गुंगारा देऊन नदीत उडी, पण शेवटी... VIDEO

पण तरूणीने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Yavatmal
Buldhana: मॉर्निंग वॉकला गेला अन् कारनं उडवले; बँक कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, बुलढाण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com