पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे अमेरिकेत उच्चशिक्षिण शिक्षण घेणाऱ्या तरुणीला एका भोंदूबाबाने पूजापाठ करुन घरातील समस्या दूर करण्याचे आमिष दाखवले आणि तब्बल १८ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय.या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीसोबत हा प्रकारत साधारण नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल२०२४ या कालावधीत घडला. सिद्धार्थ अभयकुमार आमळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो पिंपरी चिंचवड(Chinchwad) या भागात वास्तव्यास होता.
नेमके कस घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीही अमेरिकेमधील शिकागो या शहरात शिक्षणासाठी वास्तव्यास होती.आरोपीने या तरुणीला विश्वासात घेत ऑनलाइनद्वारा पूजापाठ आणि जाप करुन घरातील सर्व समस्या सोडविण्याचे आमिष दाखवले शिवाय पूजा झाल्यानंतर तिला काही रक्कम परत करतो,सुद्धा सांगितले.या भोंदूबाबाच्या खोट्या बोलण्याला भूलून तरुनीने आरोपीला ऑनलाइनद्वारे(Online) तब्बल ११ लाख ८३ हजार रुपये दिले.
शिवाय,जेव्हा तरुणी भारतात परतली तेव्हा या आरोपीने तिच्याकडून पुन्हा ५४ ग्रॅमचे सोन्याचे काही दागिने (jewelry)आणि दोन लाख ८३ हजारांची रक्कम घेतली.या नंतर तरुणीने त्या आरोपीकडे पैसे मागितले.मात्र आरोपीने तिला मॉर्फ फोटो करुन सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या घटनेला घाबरुन तरुनीने २० ऑगस्ट रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीची तक्रार दिली असून डेक्कन पोलिसांनी संशयित आरोपीविरोध्दात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरु केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.