Buldhana News : खळबळजनक! लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून एकुलत्या एक मुलाने केली आत्महत्या

Buldhana News : संतोष शहादेव घाटोळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ३१ वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याने तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.
Buldhana News
Buldhana NewsSaam TV

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याने एका तरुणाने आत्महत्या केलीये. त्याने उचलेलं हे टोकाचं पाऊल पाहून त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Buldhana News
Beed Farmer End Life: पावसाअभावी शेतातील पीक करपू लागले, चिंताग्रस्त शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संतोष शहादेव घाटोळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ३१ वर्षीय तरुणाने लग्न होत नसल्याने तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. संतोष हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो शेत मजुरीच काम करायच.

संतोष ३१ वर्षांचा होता. वयाची तिशी ओलांडली तरी आपलं लग्न जुळत नाही ही गोष्ट त्याच्या मनात सलत होती. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. शुल्लक कारणांवरून तरुण मुलांच्या मनात पटकन राग येतो आणि ते टोकाचा निर्णय घेतात.

नागपूर येथील फायनल इयरच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

VNIT म्हणजेच विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौऔद्योगिकी संस्था नागपूर येथे देखील आत्महत्येची एक घटना घडली. फायनल इयरच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. यात त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.

विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची कुणाला काहीच माहिती नव्हती. दुर्गंधी सुटल्याने जेव्हा रुम उघडली तेव्हा ही घटना समोर आली. दिव्यांशु गौतम असं विद्यार्थ्यांच नाव आहे. आत्महत्या का केली याचं ठोस कारण अद्याप समजलेलं नाही.

Buldhana News
Mumbai Police officer ends life : धक्कादायक! मुंबईत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, पोलीस वसाहतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com