Jalna Young Farmer Passed Away : दोरी हातातून सुटल्याने युवा शेतक-याचा गेला ताेल, खाेल विहिरीत पडून मृत्यू

वाटूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jalna, farmer
Jalna, farmersaam tv
Published On

Jalna Latest Marathi News : विहिरीवरील दोरी हातातून सुटल्याने तोल जाऊन युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना जालन्यातील वाटूर गावात घडली. अमोल पांडुरंग सातपुते असे मृत युवा शेतकऱ्याचे (farmer) नाव आहे. या दुर्दवी घटनेमुळं वाटूर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. (Breaking Marathi News)

Jalna, farmer
Nashik Road Accident News: नाशकात भीषण अपघात; बस अन् ट्रकची समोरासमोर धडक, 10 जणांचा मृत्यू

रात्री लाईट आल्याने अमोलने रात्रभर शेतामधील पिकांना पाणी (water) दिले. पहाटेच्या सुमारास लाईट गेल्याने अमोलने विदूत मोटारीचा स्विच बंद केला. त्यानंतर विहिरीच्या काठावर उभे राहून तोंड धुवत हाेता.

Jalna, farmer
BJP Offered Satyajeet Tambe : काँग्रेसचा युवा नेता भाजपच्या गळाला ? अखेर सत्यजीत तांबे म्हणाले, आमचं ठरलं...

विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्यांचे डोकं कठड्यावर आदळले. त्यात त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली. विहिरीतच अमाेल यांचा दुर्दवी मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांचा मृत्यदेह विहिरीतून बाहेर काढला.

Jalna, farmer
Video : चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था... राष्ट्रवादीच्या नेत्याचा वाढदिवशी हटके अंदाज

यावेळी अमाेल याच्या कुटुबांने (family) आक्राेश केला. अमाेल हा परिसरातील युवा शेतकरी हाेता. त्याच्या या दुर्दवी मृत्यूने वाटूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com