

शेंदुरसनी गावाची लोकसंख्या फक्त दीड हजार, मात्र २७ हजारांहून अधिक जन्म नोंदी सापडल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या सी.आर.एस. सॉफ्टवेअरमध्ये मोठा गैरव्यवहार उघड झालाय.
जन्म–मृत्यू नोंदीतील तफावतीमुळे अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.
संजय राठोड, साम प्रतिनिधी
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी गावातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या गावातील लोकवस्ती फक्त दीड हजार लोकांची. पण येथे २७ हजार ३९७ जणांची जन्म नोंदी आढळल्या आहेत. ग्रामपंचायतीत सी.आर.एस. सॉफ्टवेअरला जन्माच्या 27 हजार 397 नोंदी व मृत्यूच्या 7 नोंदी आढळून आल्या. शेंदुरसनी या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे दीड हजार असताना या गावामध्ये एवढ्या जन्म मृत्यू नोंदी आढळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ही बाब जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म मृत्यू यांनी त्वरित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आली. त्यानंतर घटनेची गंभीरता लक्षात घेत त्वरीत चौकशी केली. या नोंदी ग्रामपंचायत क्षेत्रातील नसून संशयास्पद असल्याचे व एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी ग्रामपंचयत मार्फत शक्य नसल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरण हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपसचांलक आरोग्य सेवा, पुणे यांना अवगत करुन दिले.
त्यांच्या मार्फत राज्य लॉगीन वरुन तपासणी केली असता शेंदुरसनी या ग्रामपंचायतीचा सी.आर.एस. आयडी मुंबई येथे मॅप असल्याचे दुरध्वनीद्वारे कळविण्यात आले. तसेच सदर प्रकरणाची तपासणी दिल्ली येथील भारताचे अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आली.
या नोंदीच्या तांत्रिक तपासाअंती या नोंदी सायबर फ्रॉड अंतर्गत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आलीय. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शहर पोलिस स्टेशन यवतमाळ येथे गुन्हा दाखल केला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व निबंधक जन्म-मृत्यू यांना आपला जन्म-मृत्यू दाखले काढण्यासाठीचा सी.आर.एस.आयडी, पासवर्ड व ओटीपी इतर कुणाला देऊ नये.
काही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरावत अवगत करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू यांनी केले. दरम्यान याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.