Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी

Yavatmal Crime: यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली. सासरच्या जाचाला कंटाळून २५ वर्षीय गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केली. या महिलेने मुलीला घेऊन विहिरीत उडी मारली.
Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी
Yavatmal CrimeSaam Tv News
Published On

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून या महिलेनेहे टोकाचे पाऊल उचलले. यवतमाळच्या दारव्हा ब्रम्ही गावात ही घटना घडली. गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पती, सासू आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये गर्भवती महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील ब्रम्ही या गावात मंगळवारी घडली. पूजा मोहन नेमाने (२५ वर्षे) आणि काव्या मोहन नेमाने ( २ वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या महिलेचे आणि तिच्या मुलीचे नाव आहे.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी
Cyber Crime : डिजिटल अरेस्ट करत वृद्धाला गंडविले; ३१ लाखात फसवणूक, ओरिसातून संशयित ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेसह तिच्या मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. या प्रकरणी लाडखेड पोलिस ठाण्यात पती मोहन रोडबा नेमाने, सासू रंजना रोडवा नेमाने आणि सासरे रोडबा नेमाने या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मृत पूजाचे वडील गुलाब ज्योतीराम शिंदे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी
Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

दरम्यान, ठाण्यामध्ये देखील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. ठाण्यातील कळवा पुलावरून या महिलेने खाडीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारात त्यांनी खाडीतून महिलेचा मृतदेह शोधून काढत बाहेर आणला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. कळवा पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Shocking: सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं, गर्भवती महिलेने चिमुकलीसह विहिरीत मारली उडी
Yavtmal Crime : यवतमाळमध्ये फुटबॉल खेळण्यावरून वाद, बंदुकीतून तीन फायर, तरुण गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com