Bus Accident: ओव्हरलोड ट्रेलरची एसटीला धडक: ४ प्रवासी जखमी

Yavatmal News ओव्हरलोड ट्रेलरची एसटीला धडक: ४ प्रवासी जखमी
Bus Accident
Bus AccidentSaam tv
Published On

यवतमाळ : भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात बसमधील ४ प्रवासी जखमी झाले (Yavatmal) आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. (Maharashtra News)

Bus Accident
Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश बंदी; नागपंचमीच्या दिवसासाठी हे आहे कारण

यवतमाळच्या भोसा मार्गावर आज हा अपघात घडला आहे.ओव्हरलोड ट्रेलर सोलापूरवरून यवतमाळ मार्गाने रायपूर जात होता. दरम्यान बस ही प्रवासी घेऊन यवतमाळवरून आदिलाबादकडे जात असताना ट्रेलरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक थेट बसवर जाऊन (Bus Accident) धडकला. या अपघातात ट्रेलरचा समोरील भाग चुराडा झाला. 

Bus Accident
Jalgaon Crime News: मुंबईमधील चोरीच्या सोन्याची तोंडापूरला विक्री; एकास अटक, एक फरार

सदर अपघातात बसमधील चार प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अपघतानंतर मार्गावरवाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या मार्गावरील खोळबलेली  वाहतूक सुरळीत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com