Yavatmal News Accidental death of teacher and sarpanch while going for morning walk in pusad
Yavatmal News Accidental death of teacher and sarpanch while going for morning walk in pusadSaam TV

Yavatmal News: मॉर्निंग वॉकला निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत शिक्षकासह माजी सरपंचाचा मृत्यू

Yavatmal Accident News: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन व्यक्तींना भरधाव वाहनाने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
Published on

संजय राठोड, साम टीव्ही

Yavatmal Accident News

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन व्यक्तींना भरधाव वाहनाने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. थरकाप उडवणारी ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या मांडवा गावात घडली. सुधाकर आडे आणि नरेंद्र धाड अशी घटनेतील मृतकांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal News Accidental death of teacher and sarpanch while going for morning walk in pusad
ST Bus News: मनोज जरांगेंचं उपोषण मागे, राज्यातील एसटी बससेवा पूर्ववत होणार; प्रवाशांचं टेन्शन मिटणार

याप्रकरणी पोलिसांनी (Police) वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यातील मांडवा गावाचे माजी सरपंच सुधाकर आडे (वय ५८) आणि शिक्षक नरेंद्र नामदेव धाड (वय ५०) दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास दोघेही नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी (Yavatmal News) घराबाहेर पडले. मांडवा गावातील हनुमान परिसरात ते आले असता, भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जाणार्‍या एका मॅजिक वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. नरेंद्र धाड हे उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील सम्यक दृष्टी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Yavatmal News Accidental death of teacher and sarpanch while going for morning walk in pusad
IMD Rain Alert: हवेतील गारवा वाढल्याने वातावरणात मोठा बदल; येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com