शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच, महिन्याभरात 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्ये महिन्याभरात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं राज्य हादरलंय...एकीकडे सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली असताना दुसरीकडे शेतकरी टोकाचा निर्णय का घेतायेत? उदासीन यंत्रणेच्या कारभारामुळे बळीराजा कसा हतबल झालाय?
farmer
४० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदतीसाठी तिघेच ठरले पात्र; विदर्भातील भयावह परिस्थिती
Published On

हा आक्रोश आहे...एका बळीराजाच्या पत्नीचा... घरातल्या कर्त्या पुरुषानं सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर आणि शेतमाल हमीभावाचा प्रश्न यामुळे कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. ज्यामुळे आता कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय.. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे हे सत्र थांबण्याचे नाव नाहीय...ज्या जिल्ह्यातून शेतकरी प्रश्नांसाठी मोठी आंदोलनं उभी राहिली...त्याचं जिल्ह्यात अवघ्या 25 दिवसात 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत..त्यातही गेल्या 72 तासात तीन शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळलंय...

दरम्यान यावरुन सरकारवर हल्लाबोल होतोय. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नसून शासनाकडून एकप्रकारे शेतकऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय...दुसरीकडे महायुती सरकार राज्यातील 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या तयारीत आहे. 2 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यासोबतच, नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

निवडणुकीत सत्ताधा-यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे...यवतमाळमधील या 18 आत्महत्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाचं द्योतक म्हणायच्या का? सरकारी योजना केवळ कागदावरच आहेत. अंमलबजावणीत होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या जीवावर उठतोय का? जगाचा पोशिंद्याला जगवण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com