Yavatmal Crime News: शेतातून वडील घरी आले अन्‌ मुलाचा झाला घात; अज्ञातांकडून युवकाची हत्या

शेतातून वडील घरी आले अन्‌ मुलाचा झाला घात; अज्ञातांकडून युवकाची हत्या
Yavatmal Crime News
Yavatmal Crime NewsSaam tv
Published On: 

यवतमाळ : यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील विठोली येथे एका १८ वर्षीय युवकाची हत्या (Crime News) झाल्याची घटना उघडकीस आली. सार्थक दीपक गावंडे अस मृत युवकाचे नाव आहे. (Tajya Batmya)

Yavatmal Crime News
Nashik Crime News: बनावट बंदुकीचा धाक दाखवून लुटले; पाच महिन्‍यानंतर आरोपी ताब्‍यात

सार्थक व त्याचे वडील दीपक गावंडे हे दोघे जनावरांच्या (Yavatmal News) चाऱ्यासाठी शेतात गेले होते. वडील दीपक गावंडे हे चारा घेऊन घरी आले. तर मुलगा शेतातच होता. त्यानंतर काही वेळातच दीपक हे चाऱ्यासाठी पुन्हा शेतात गेले असता सार्थक मृतावस्थेत पडलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे वडील चांगलेच हादरले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठत दिग्रस पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Yavatmal Crime News
Ratnagiri News: रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू

हत्‍येबाबत गुढ

सार्थकच्या डोक्यावर जबर प्रहार केल्याने चेहरा रक्तबंबाळ झाला आहे. सार्थकने नुकतीच झालेली 12 वी ची परिक्षा दिली होती. गावात गावंडे कुटुंबाचा कुणाशीही वाद नाही. त्यामुळेे कोणी हत्या केली आणि का केली असावी असा प्रश्न घटनेनंतर उपस्थित केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.