२८ जानेवारीला आई-वडिलांसोबत शेवटचं बोलणं, खान्देशातील मर्चंट नेव्हीतील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता; कुटुंबीयांचा टाहो

Dhule Youth Goes Missing Ocean off Oman : यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एमटी अथेना १ हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते.
Yash Deore missing in Oman Sea
Yash Deore missing in Oman Sea SaamTV
Published On

धुळे : धुळे तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी तथा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत यश देवरे हा २१ वर्षीय तरुण ओमानच्या महासागरात बेपत्ता झाला आहे, त्याचा शोध सध्या सुरू आहे. बेपत्ता यश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. ठाण्यातील स्वराज मराइन - सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडमधल्या एमटी अथेना जहाजवर तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला होता. त्याच्याशी २८ जानेवारीला सायंकाळी कुटुंबीयांचं शेवटचं बोलणं झालं होतं.

त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच २९ जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीतर्फे देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला, त्यावेळी यश हा चालत्या जहाजमधून पाय घसरून समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे व त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. परंतु त्यानंतर कुठलाही संपर्क संबंधित जहाज कंपनीशी होऊ शकला नसून, संबंधित देऊर कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहे. तर त्यांची पायाखालीच जमीन सरकली आहे.

Yash Deore missing in Oman Sea
Pune Crime : शरीफ हम नहीं, हमारी आदते; पुण्यात तरुणाला कोयत्याने मारहाण, इन्स्टाला व्हिडिओ टाकत हत्या, पाहा Video

यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग आणि निकटवर्तीय यशच्या शोधात असून एमटी अथेना १ हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र, हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची तक्रार देवरे कुटुंबियांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार दिली आहे.

Yash Deore missing in Oman Sea
Mumbai News : मुंबईत बांगलादेशींवर धाड, पाळत ठेवली आणि ७ जणांना बेड्या ठोकल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com