Pune Crime : शरीफ हम नहीं, हमारी आदते; पुण्यात तरुणाला कोयत्याने मारहाण, इन्स्टाला व्हिडिओ टाकत हत्या, पाहा Video

Pune Yerawada Youth Beaten and Killed Video Goes Viral : येरवड्यातील RS कंपनी नामक टोळीने एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.
Pune Crime
Pune CrimeSaamTV
Published On

पुणे : पुण्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे.कोयता गँग, घरफोडी, वाहनांची तोडफोड, हत्या आणि बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसत आहेत. पुणे हे आता गुन्हेगारीचं जणू हब बनलंय. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असताना देखील, संघटित गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला दिसत नाहीय. असाच एक भयानक प्रकार शहरातील येरवडा येथे घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.

येरवड्यातील RS कंपनी नामक टोळीने एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मारहाण करताना संबंधित तरुणाला "कुत्रा" असं बोलण्यात येत असल्याचं देखील यात आहे. दुश्मन टोळीसोबत का फिरतोस? असा आरोप करत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली.

Pune Crime
Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित, बाईक अडवली म्हणून वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घातला

या घटनेमुळे संबंधित तरुण प्रचंड भयभीत झाला असून त्याच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी त्याला नातेवाईकांच्या घरी ठेवले आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

अनसफ हसनेन अश्रफ असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, २७ जानेवारी रोजी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपी विकी ऊर्फ विजय कंबळे, तुषार शेठे आणि शैलेश ससाणे यांना अटक केली आहे. या प्रकरणी तरुणाच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

Pune Crime
Vande Bharat train: ९ वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार, काय आहे मेगाप्लान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com