ठाण्यातील घोडबंदर रोड येथे हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेनं आपल्या एका वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतली. यात दोघांचाही मृत्यू झाला.
रक्षाबंधनाला सातारा येथील बहिणीकडे जाऊ न दिल्यानं नवऱ्यासोबत वाद झाला. त्यानंतर महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना शुक्रवारी घडली. घोडबंदर रोड येथे ही महिला पतीसह राहत होती. नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर विवाहितेनं एका वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. (Latest News In Marathi)
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रियांका मोहिते असं या महिलेचं नाव आहे. तर धुर्वी असं मुलीचं नाव आहे. प्रियांकाला रक्षाबंधनासाठी सातारा येथील बहिणीकडे जायचं होतं. परंतु पतीनं नकार दिला.
यावरून दोघांचं भांडण झालं. (Husband-Wife) बहिणीकडे जाऊ न दिल्याचा राग आल्यानं महिलेनं सहाव्या मजलावरील अपार्टंमेटच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. पती आणि शेजारच्यांनी तिला आणि मुलीला नजीकच्या रुग्णालयात (Hospital) नेले. तिथं डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केलं.
प्रियांका मोहितेला बहिणीकडे जायचं होतं. प्रियांकाची बहीण साताऱ्यात राहते. तिला तिच्याकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा होता. परंतु पतीने तिला जाऊ दिलं नाही. मुलगी एका वर्षाची आहे. तिला घेऊन इतक्या लांबचा प्रवास करू नको, असं त्यानं सांगितलं. (Latest News In Thane)
याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं. याचा राग मनात धरत तिने सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियांकाच्या पतीचा जबाब नोंदवला आहे. घरातील इतर सदस्यांचा देखील जबाब नोंदवण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.