Sanjay Raut : निवडणुकीआधीच मविआ फुटणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने मोठी उलथापालथ

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सूचक विधान करत म्हटलं की, मुंबईसह महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा) आणि मनसेने एकत्र लढावे, असा लोकांचा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात चर्चा होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut Saam Tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांच्या तारखा येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणूका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मनसेने एकत्ररित्या लढाव्यात असा लोकांचा दबाव असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबाबतही भाष्य केले.

काय म्हणाले खासदार संजय राऊत ?

गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महापालिका निवडणूका वेगवेगळ्या लढवाव्यात अशा प्रकारच्या बातम्या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मंचावर गेले आणि महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष झाला. त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय? त्यावर माझे उत्तर असे आहे की, इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली. आम्ही एकत्र निवडणुका लढलो आणि आम्हाला चांगले यश मिळालं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही. अशी खंत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली."

Sanjay Raut
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

ते पुढे म्हणाले की, "विधानसभेला महाविकास आघाडी स्थापन झाली. आणि त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी होती. आजही महाविकास आघाडी असून कुणीही यातून बाहेर पडलेलं नाही. आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आम्ही आजही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातात. आता विषय राहतो महानगरपालिकांचा त्यासंदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की, मविआ किंवा इंडिया आघाडी या स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढतील का? पण त्यासाठी त्यांची स्थापना झालेली नाही.

Sanjay Raut
Sanjay Raut : 'गुलाबराव पाटलांच्या खात्यात ५० कोटी बेकायदेशीपरणे जमा, पक्ष सोडताना थरथरत होते'; संजय राऊतांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्था खासकरून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात,. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं. तर कधी स्थानिक आघाडी करावी लागते. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी म्हणालो, आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण पाच तारखेला पाहिला असेल. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना ( उबाठा ) आणि मनसे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील. असे राऊत म्हणाले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com