
मुंबई : राज्यात हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख यांनी हिंदी सक्तीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचदरम्यान, काल महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्याचदरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज झालेल्या साम टिव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या कार्यक्रमात मोर्चाबाबत भाष्य केलंय. ते म्हणाले की, 'मोर्चा एकत्र काढण्याचं आमचं ठरलं होतं. आमचा मोर्चा सोमवारी ७ जुलैला काढणार होतो, आणि राज ठाकरेंचा मोर्चा रविवारी ६ तारखेला निघणार होता. पण आम्ही आता शनिवारी ५ तारखेला विजयी मोर्चा काढणार आहोत', असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, 'आमचे आणि राज ठाकरेंचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यातून विजयी मोर्चा आपण काढायचा हा विचार पुढे आला, आणि मुळात राज ठाकरेंनीच हे मला सूचवलं. राज ठाकरे म्हणाले की, दोन्ही एकाच कुटुंबातील आहोत, दोन्ही ठाकरे आहोत, त्यामुळे चित्र चांगलं दिसणार नाही. त्यावर त्यांनी वरळीच्या डोंबला हा विजय मोर्चा करायचं देखील त्यांनी सूचवलं', असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल
पक्षाला बरेच आमदार-खासदार-नेते सोडून गेले, आणि त्यांनी तुमच्या नावाने खडे फोडले, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, 'कारण मी पक्षाबरोबर निष्ठेने काम करतो, आणि कुणाचे दळभद्री प्रकार असतात ते पक्षात कुणाला सहन करु देत नाही. पक्षाला ब्लॅकमेल करणं मला आवडत नाही. आज वाईट काळ चालला असेल तर त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही पक्षाला आणि पक्षप्रमुखाला ब्लॅकमेल करु नका, आणि जर करणार असाल तर भींत म्हणून मी तिथे उभा असेल. त्याच्यामुळे माझ्यावर हल्ले होणारच'.
'माणसं सोडून गेली, आमदार गेले, खासदार गेले हे खरंय, पण त्याला मी कसाकाय जबाबदार? कुणी तरी मला समजावून सांगायला पाहिजे की तुम्ही जबाबादार आहात. एकनाथ शिंदे माझ्यामुळे गेले? ते सर्व लोकं ईडी, सीबीआय आणि आपल्या प्रॉप्रर्टी वाचविण्यासाठी तिकडे गेले. तुरुंगात जाण्याची त्यांना भीती वाटली. मी पण तुरुंगात गेलो, मग मी पण पक्ष सोडून जायला पाहिजे होतं. गुलाबराव पाटलांच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये बेकायदेशीपरणे जमा झाले. ते पक्ष सोडताना थरथर करत होते उद्धव ठाकरेंसमोर की, मला ईडीवाले घेऊन जातील मला जावं लागेल. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय यांचे नखरे आणि यांचा डरपोकपणा', असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.