शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? कृषीमंत्र्याकडून पुन्हा आश्वासनाची खैरात

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली असून 52 लाख शेतकरी सातबारा कोरा होणार का याकडे लक्ष लागले आहे.
Farmer
FarmerSaam tv
Published On

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी मोठी घोषणा केलीय.त्यामुळे यावेळी तरी शेतकऱ्याचा सातबारा खरंच कोरा होणार का? राज्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

कधी दुष्काळाने पिचलेल्या, अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं.मात्र आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटलेत.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. आणि त्यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केलीय.

Farmer
Darshan Scam : भाविकांची लूट! त्र्यंबकेश्वरमध्ये ३ हजारात १० मिनिटात दर्शन ? दर्शन स्कॅमचं 'रेटकार्ड' उघड?

खरंतर विदर्भ आणि मराठवाड्यात 2025 मध्ये 1 हजार 987 शेतकऱ्यांनी तर 2026 च्या जानेवारीमध्ये 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय.त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली जात होती. आतापर्यंत 3 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. मात्र त्यानंतरही शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलाच आहे. त्यामुळे आता कर्जमाफीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचा वेळेत अहवाल येणार का? आणि शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा केला जाणार का? याकडे राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय...

Farmer
IRIS Dena : भारतामधून निघालेल्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला, ८७ जणांचा मृत्यू, ६७ बेपत्ता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com