Leopard : ऊसाच्या शेतातील बिबट्या घरात, पुणे-नगरसह ६ जिल्ह्यात दहशत

Maharashtra leopard attacks increasing reasons : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्यानं तब्बल तीन तास दहशत माजवली. पाच नागरिक आणि दोन वनरक्षक जखमी. शहरात बिबट्याचा मुक्त संचार का वाढतोय? सरकारी ४० कोटींच्या बंदोबस्तानंतरही बिबट्या-मानव संघर्ष कमी न होण्याची कारणं जाणून घ्या.
why leopards are entering residential areas in Maharashtra
why leopards are entering residential areas in MaharashtraSaam TV marathi News
Published On
Summary
  • नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्यानं दिवसाढवळ्या तीन तास मुक्तपणे संचार केला.

  • बिबट्याच्या हल्ल्यात पाच नागरिक आणि दोन वनरक्षक जखमी झाले.

  • वनविभागानं मोठ्या प्रयत्नांनंतर बिबट्याला डार्ट मारून पकडलं.

  • राज्यभर वाढलेल्या बिबट्या-मानव संघर्षामागे अधिवासातील अतिक्रमण आणि नागरी विस्तार कारणीभूत ठरत असल्याची चर्चा.

why leopards are entering residential areas in Maharashtra : ऊसाच्या शेतात दिसणारा बिबट्या घहरापर्यंत पोहोचलाय... त्यामुळं याच बिबट्याची दहशत शेतापर्यंतच राहिली नाहीये तर घरापर्यंत पोचलीय. हा बिबट्या कुठल्या शहरात घुसला आणि त्यानं सर्वसामान्यांची कशी दाणादाण उडवलीय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

हा व्हिडिओ पहा.... याच बिबट्यानं नाशिककरांची दिवसाढवळ्या झोप उडवली... बिबट्याच्या रेस्क्यूआधी गंगापूर रोड परिसरात बिबट्यानं एकच धुमाकूळ घातला .. आता याचं रस्स्त्यावरून बिबट्याच्या मुक्तसंचाराचे CCTV तील व्हिडिओ समोर आलेत...तब्बल तीन तास बिबट्या शहरात मुक्तपणे संचार करत होता.

गंगापूर रोडवरील कागमार नगर परिसरातील एका बंगल्यामधून बिबट्या बाहेर पडला आणि उंच भिंतीवरून उडी मारत... त्यानं दुसऱ्या दिशेला झेप घेतली...त्यावेळी घरात असणाऱ्या नागरिकांनी एकच आरडाओरडा केला. वनविहार परिसरातील बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीत हा बिबटया शिरला.. कामगारांना हा बिबट्या दिसताच त्यांनी धुम ठोकली.. काही जण इमारतीवर गेले तर काहींनी गाडीत लपून बिबट्यापासून वाचण्याचा प्रयत्न केला.

why leopards are entering residential areas in Maharashtra
Thane to Bhiwandi : ठाणे ते भिवंडी, आता फक्त ७ मिनिटांचा प्रवास, ६ पदरी पूल होणार, वाचा MMRDA चा प्लॅन

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात पाच नागरिकांसह दोन वनरक्षक जखमी झाले.. त्यानंतर तब्बल 3 तास वनअधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करत होते..आणि मोठा जमाव बघून बिथरलेल्या बिबट्याला अखेर डार्ट मारून जेरबंद करण्यात आलं. एकेकाळी बिबट्याला बघण्यासाठी प्राणीसंग्रहालयात जावं लागायचं नंतर हा बिबट्या शेतात, शिवारात मग गावखेड्यात दिसायला लागला आणि आता तर शहरात दिसू लागलाय.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात 2 हजारांहून अधिक बिबट्यांची दहशत

अहिल्यानगरमध्ये दोन मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी

कोल्हापुरात बिबट्याच्या हल्ल्यात वनाधिकारी जखमी

सिंधुदुर्गमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

नांदेडमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकामं खोळंबली

why leopards are entering residential areas in Maharashtra
नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

बिबट्याची ही दहशत पाहता महिन्याभरापूर्वी बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 कोटींची तरतूद सरकारनं केली होती... मात्र त्यानंतरही राज्यातील बिबट्यांची दहशत कमी झालेली नाहीय.... बिबटया-मानव संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदी हा शेवटचा पर्याय असल्याचं वारंवार सांगीतलं जातयं...मात्र नसबंदीनं हे हल्ले रोखता येतील का? बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासावरील अतिक्रमण नागरी वस्तीतील बिबट्याच्या मुक्तसंचाराला कारणीभूत ठरत आहे का? एकूणच बिबट्याची राज्यातील दहशत रोखणं वनविभागासमोरच मोठं आव्हानं असणार.. हे निश्चित...

why leopards are entering residential areas in Maharashtra
DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com