रोहित कदम, साम टीव्ही प्रतिनिधी
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी गुप्त भेट घेतली. त्यानंतर आपल्याला पूर्वकल्पना न देताच भेट घेतल्यानं या नेत्यांना सुनेत्रा पवारांनी जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मात्र, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या या गुप्त भेटीमागे कुठली राजकीय गणिते दडली आहेत का? पाहूया यावरचा हा रिपोर्ट.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंच्या वर्षावरील गुप्त भेटीमुळे पक्षात नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे. पटेल-तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतलेल्या भेटीची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कल्पनाच नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे यांना देवगिरीवर बोलावून थेट जाब विचारल्याची चर्चा सुरू झालीये. तटकरेंनी मात्र या प्रकरणावर सारवसारव करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.
एव्हंढच नाहीतर महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे कुणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असं सांगत पक्षातील नेत्यानं पटेल-तटकरेंच्या भेटीचं समर्थन केलंय..
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आव्हान देण्यात आलंय. आणि यामागे प्रफुल्ल पटेल असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर लगेचच तटकरे-पटेलांनी परस्पर वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा घाट घातला. त्यामुळे राष्ट्रवादीत सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. तर दुसरीकड पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होण्याबाबतही चर्चा सुरू आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील बैठकीला जयंत पाटीलही असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून काही वेगळी गणितं आखली जातायत का? याचीच चर्चा आता रंगू लागलीय.
ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.