Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसोबत कोणते खासदार, कोणत्या ६ खासदारांनी सोडली साथ? सर्वांची नावं आली समोर

Operation Tiger Maharashtra update : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. कोण आहेत हे खासदार? जाणून घ्या संपूर्ण यादी आणि राजकीय घडामोडी.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam TV Marathi
Published On

Uddhav Thackeray latest news : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्याची मागणी केली आहे. ५ खासदार हे ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला गैरहजर होते, ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे होणाऱ्या मेळाव्यात ते अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. या ६ खासदारांपैकी ४ खासदार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला गेले आहेत. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, दिल्लीत घडामोडींना वेग, तारीख ठरली

ठाकरेंच्या ९ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

शिंदे गटाच्या वाटेवर असलेले ६ खासदार:

१. संजय जाधव (परभणी)

२. संजय देशमुख (यवतमाळ)

३. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

४. ओमराजे निंबाळकर (धाराशिव) - नॉट रिचेबल

५. संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)

६. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
अखेर ऑपरेशन टायगर झालचं! अजित पवार गटासह काँग्रेसला मोठा धक्का; तब्बल १० नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

यातील संजय जाधव आणि संजय देशमुख हे नांदेड विमानतळावरून खासगी विमानाने, तर इतर खासदार विशेष विमानाने दिल्लीत पोहोचले आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच घडणाऱ्या या मोठ्या राजकीय भूकंपाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंचे खासदारांसोबत आमदार, नगरसेवकही फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या नेत्याचा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com