

महिलांसाठी दरमहा ₹3,000 देणारी अन्नपूर्णा योजना जाहीर.
₹5 मध्ये मच्छी-भात जेवण उपलब्ध करून देण्याची घोषणा.
शाळा आणि मंदिराजवळ दारू दुकानांना परवानगी नाही.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी बंगालच्या नागरिकांसाठी योजनांचा पिटारा खुला केला. मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सोमवारी आपला दुसरा 'जनता दरबार' आयोजित केला होता. यात नोकरीच्या शोधात असलेले तरुण, शिक्षक, व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी आले होते.
मुख्यमंत्र्यांनी आज जनतेसाठी अनेक योजनांच्या घोषणा जाहीर केल्या. महिलांना दरमहा ३,००० रुपये देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेसाठी राज्य सरकार २७ मे पासून अर्ज वाटप सुरू केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळांच्या एक किलोमीटर परिसरात दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अन्नपूर्णा योजनेचे अर्ज राज्य सचिवालयाकडून उद्यापासून दिले जातील. सर्व भारतीय नागरिक या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत." मुख्यमंत्री म्हणाले, "आमच्या अन्नपूर्णा योजनेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होतेय, महिलांनी अर्ज भरताच त्यांच्या बँक खात्यात ३,००० रुपये हस्तांतरित होण्यास सुरुवात होईल."
मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा करताना सांगितलं की, सरकार बंगालमधील काही विशेष कॅटीनमध्ये आठवड्यातून दोनदा ५ रुपयात मच्छी-भातचं जेवण दिलं जाईल. यासह बंगाल सरकार आरोग्य विभागाच्या वेगळं एक आयुष विभागाचं निर्माण करेल. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात नोकरीच्या आशेने मोठ्या संख्येने तरुण आले होते.
मुख्यमंत्री शुभेंदु हे येण्याआधीच सॉल्ट लेकमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयाबाहेर शेकडो लोक जमले होते, ज्यामुळे इमारतीच्या आजूबाजूच्या अरुंद रस्त्यांचे प्रतीक्षागृहात रूपांतर झाले होते. नोकरी शोधणाऱ्यां तरुणांच्या हातात फायली होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांचे गठ्ठे उचलले होते. शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, परिचारिका, पोलिसात नोकरी करू इच्छिणाऱ्या महिला आणि इतरही उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.