Weather update : कुठे थंडीची चाहूल तर कुठे मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा इशारा काय?

Weather update News in Marathi : राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच पाऊस पडत असल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,.
Rain Update
Rain UpdateSaam Tv
Published On

Weather Forecast News in Marathi : राज्यात आज काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून तापमानत घट झाल्यामुळे थंडी वाढू लगाली आहे. त्याशिवाय मुंबईमधील हवेची गुणवत्ता ढासळल्यामुळे काहीसे रोगाट वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्राचा काही भाग केरळ, तामिळनाडू या राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. दक्षिण – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नगर व उत्तर सं.नगर, लातूर नांदेड परभणी आणि नाशिक पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा अश्या १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.

राज्यात थंडीची चाहूल -

दिवाळीनंतर राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात सध्या पहाटे गारवा जाणवत आहे. राज्यात अनेक शहरातील किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. अपवादा‍त्मक काही ठिकाणे वगळता राज्यात कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत राहण्याची शक्यता आहे. मागील ३ दिवसांपासून नाशिक, अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे नोंदवली गेली.

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली -

धूळ, वाहने आणि आता फटक्यांच्या धूर यामुळे ऐन दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

अतिसूक्ष्म घन व द्रव कण हे 2.5 मायक्रोमीटर्सहून कमी व्यास असलेले हुंगले जाणारे प्रदूषणकारक कण असतात जे फुफ्फुसे आणि रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करू शकतात ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात. सर्वात गंभीर परिणाम फुफ्फुसे आणि हृदयावर होतात. संसर्गाच्या परिणामी खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, वाढलेला दमा आणि जुनाट श्वसनाच्या आजाराचा विकास होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com