Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला

Maharashtra Weather News: देशातील १३ राज्यात आज तुफान पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे.
Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
IMD Alert Saam Tv
Published On: 

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचे रुपांतर आता चक्रीवादळात होऊ लागले आहे. याचा परिणाम दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जाणवेल. यामुळे देशातील १३ राज्यांमुळे वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसादरम्यान ताशी १०० किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर इकडे महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडी वाढली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि अंदमान व निकोबार बेटांचा समावेश आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तर ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. बंगलाच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याने ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्रात तापमानात पुढचे काही दिवस चढ-उतार पाहायला मिळेल. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहिल. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस देखील पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
Weather Update: देशाला चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ९ राज्यांना इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात कमाल तापमानात घट झाली असली तरी देखील किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी राज्यातील सर्वांच निचांकी तापमानाची नोंद निफाड येते झाली. निफाडमध्ये ११.१ अंश सेल्सिअस तापमान होते. तर धुळ्यात १२ अंश सेल्सिअस आणि जेऊर येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला
Weather Update:145 किमीच्या वेगानं येतंय चक्रीवादळ; सोसाट्याच्या वाऱ्यासह 13 राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.