Rain Forecast For net 3-4 Hours : मुंबईसह ४ जिल्ह्यांसाठी पुढील ३-४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert in State : काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023SaamTv
Published On: 

रुपाली बडवे

Rain Forecast : राज्यातील अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बसरत आहे. राज्यातील ४ जिल्ह्यांना आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील ३-४ तास महत्वाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon 2023
Maharashtra Rain Alert : आज पुण्यासह ४ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई-कोल्हापूरसह ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागातच्या इशाऱ्यानुसार २६ जुलै रोजी पुढील ३-४ तासांत सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस (Heavy Rain)  पडण्याची शक्यता आहे.

काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. (Latest News)

Monsoon 2023
Mumbai Dam Water Level (26 Jul): गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारा तिसरा तलाव 'ओव्हरप्लो'; कोणत्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?

कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

उद्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अत्यंत जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com