Rain
Rain Saam TV

Maharashtra Rain Alert : आज पुण्यासह ४ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई-कोल्हापूरसह ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Forecast For Maharashtra : कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पुढील 2-3 दिवसांमध्ये सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहील.
Published on

Weather Rain Forecast : राज्यातील काही भागांत मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. काही धरणांच्या पाणीपातळीतही चांगलीच वाढ झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पुढील 2-3 दिवसांमध्ये सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहील. या भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain)  अंदाज आहे.

मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आली आहे. तर २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest News)

Rain
Kolhapur Rain Update : कोल्हापूरवर पुन्हा पुराचं संकट? राधानगरी धरण भरलं, पंचगंगाही इशारा पातळीवर

कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

उद्या रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अत्यंत जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Maharashtra News)

Rain
Kolhapur Wall Collapse News : कोल्हापुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, दुसऱ्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

कोल्हापूरकरांची चिंता कायम

कोल्हापूरसाठी उद्याही ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोल्हापुरातील धरण क्षेत्रात मागील १०-१२ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणी जवळपास भरलं आहे. पंचगंगा नदीही इशारा पातळीच्यावर वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com