Weather Alert : अवकाळीचं संकट अजून टळलेलं नाही, राज्यासाठी पुढील ३ दिवस धोक्याचे; हवामान विभागाचा अंदाज काय?

Weather Updates : राज्यात सलग पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather Updates Saam TV
Published On

Maharashtra Weather Updates : राज्यात सलग पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झालेत. अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Weather Updates
Farmer March : भाऊ गेला तरी माघार नाही, आमच्या मागण्या मान्य करा; मृत कुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांची भूमिका

मराठवाड्याला गारपीटीचा तडाखा

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीट, अवकाळी पावसाचा कहर सुरूच होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. (Weather Forecast

उखळी (ता. गंगाखेड) येथील बाळासाहेब बाबूराव फड (६०), परसराम गंगाराम फड (४०), साडेगाव (ता. परभणी) येथील आबाजी केशव नहातकर, शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ओमकार भागवत शिंदे (१५) यांचा मृतात समावेश आहे.

तर इतर चार जण वीज अंगावर पडल्याने जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीसह सोयगावमध्येही वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे वाघूर नदीला पूर आला होता. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ते रखडले आहेत. (Weather Updates

Maharashtra Weather Updates
Sport News : कर्णधार झाला अन् रंग बदलला, हार्दिकने केला विराटचा अपमान? VIDEO व्हायरल

राज्यासाठी पुढील ३ दिवस धोक्याचे

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. २० मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावलेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगांव, आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता अधिक जाणवत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com