शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर, विद्यापीठाने पेटंटवर भर द्यावा

राहुरीतील फुले कृषी विद्यापीठास राज्य कृषी मंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली.
राहुरीतील फुले कृषी विद्यापीठास राज्य कृषी मंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली.
Published On

अहमदनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाची प्रतिमा आता सुधारत आहे. कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता कृषी पंढरी समान राहुरी कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

विद्यापीठात शास्त्रज्ञ सुसंवाद बैठकीला मार्गदर्शन करतांना कदम बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, नगर विकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. रोहीत पवार, आ. लहू कानडे, कार्यकारी परिषद सदस्य आ. नरेंद्र दराडे, संचालक डॉ. शरद गडाख उपस्थित होते. We will provide extra funds to Rahuri University abn79

राहुरीतील फुले कृषी विद्यापीठास राज्य कृषी मंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली.
Sanjay Raut on Narayan Rane | नारायण राणे यांचे नाव न घेता राऊतांची टीका;पाहा व्हिडीओ

याप्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचा कृषीशिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण, प्रशासकीय व आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले व कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी आभार मानले.

दरम्यान सर्व मान्यवरांनी उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प आणि उद्यानविद्या रोपवाटीका या प्रकल्पांना भेटी दिल्या.We will provide extra funds to Rahuri University abn79

डॉ. विश्वजीत कदम यांनी सध्याचे हवामान बदल लक्षात घेता कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याची स्थिती लक्षात घेता सेंद्रिय शेतीच्या संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. विद्यापीठांनी संशोधन बाबींवर पेटंटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन विविध प्रकाशनामध्ये प्रकाशित करावे अशा सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com