

- सागर निकवाडे
Nandurbar News : नंदुरबार शहरावर भविष्यात पाण्याचे संकट निर्माण हाेऊ नये यासाठी उद्यापासून (ता. 2 ऑगस्ट) शहरात पाणी वितरणात कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे. (Maharashtra News)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अत्यल्प 40 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जुलै संपल्यानंतरही धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाले नाही.
त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेत नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (ता. 2 ऑगस्ट) पालिका प्रशासन करणार आहे. दरम्यान नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.