Washim : २० लाखांची इमारत, ४० लाखांची दुरुस्ती! वाशिममध्ये निधी उधळपट्टीचा प्रकार उघड

Washim News : वाशिम येथे २० लाखांत उभारलेल्या इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली ४० लाख रुपये खर्च झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Washim : २० लाखांची इमारत, ४० लाखांची दुरुस्ती! वाशिममध्ये निधी उधळपट्टीचा प्रकार उघड
Washim NewsSaam Tv
Published On
Summary
  • वाशिममध्ये निधी उधळपट्टीचा आरोप

  • २० लाखांची इमारत, ४० लाखांची दुरुस्ती

  • नागरिकांचा संताप, चौकशीची मागणी

  • अजून ६० लाख खर्चाची मागणी वादात

मनोज जैस्वाल, वाशीम

Washim Karanja Taluka Kamargaon वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव इथे शासकीय निधीच्या उधळपट्टीचा अजब प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत ने २० लाख रुपये खर्च करून नवी इमारत उभारली असताना, याच इमारतीवर किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ४० लाख रुपये खर्च केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली होती. त्यामुळे त्याची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीने नव्यानेच उभारलेल्या महिला बचत गट माल विक्री केंद्रात स्थलांतरित करण्यात आली. रुग्णालयाने विविध विभागात पार्टिशन करण्यासाठी सार्वजनिक विभागाकडे मागणी करण्यात केली आणि या मागणीची पूर्तता देखील करण्यात आली.

Washim : २० लाखांची इमारत, ४० लाखांची दुरुस्ती! वाशिममध्ये निधी उधळपट्टीचा प्रकार उघड
Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

या मागणी नंतर, इमारतीत या विभागाने अल्युमिनियम आणि काचेचे साहित्य वापरून भिंती उभारल्या, तसेच दुसरी काही किरकोळ कामे करण्यात आली. या कामासाठी वाशिमच्या सार्वजनिक विभागाने तब्बल ४० लाख रुपये उधळले असल्याची माहिती समोर आली आहे.

Washim : २० लाखांची इमारत, ४० लाखांची दुरुस्ती! वाशिममध्ये निधी उधळपट्टीचा प्रकार उघड
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला हा शासकीय निधी कमी खर्च झाला की काय? असं वाटतं असताना, अजून या इमारतीच्या बाहेरील काही कामे करण्यासाठी आणखीन ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय पैशाच्या उधळपट्टीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, या कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com