Wardha Tona  Woman burnt body found
Wardha Tona Woman burnt body foundSaamTV

Wardha Crime : झाड पेटलेले, त्यातून धुराचे लोट, जळालेल्या अवस्थेत आईचा मृतदेह; लेकाला पोहोचताच वेगळी शंका

Wardha Crime News : ही घटना गावातील शाळेजवळच्या परिसरात उघडकीस आली. मुलगा प्रफुल्ल शनिवारी घटनास्थळी गेला. त्याने पाहणी केली असता जळालेल्या अवस्थेत आईचा मृतदेह आढळला.
Published on

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : आर्वी तालुक्यातील टोना येथे जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुहास रमेश काळबांडे (वय ५०, रा. दत्त वॉर्ड, आर्वी, ह.मु.टोना, ता.आर्वी) असं मृत महिलेचं नाव आहे. महिलेचा मृतदेह जाळून घातपात केल्याची शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी तात्काळ तपास करण्याची मागणी संतप्त परिवाराने केली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती.

मृत महिला मागील १८ ते २० वर्षांपासून टोना येथे कामानिमित्त वास्तव्याला होती. तिचा मुलगा प्रफुल्ल रमेश काळबांडे (वय ३०) अधूनमधून तिला भेटायला टोना येथे जात होता. मुलगा प्रफुल्ल याला पोलीस पाटील सचिन बनसोड यांनी फोनवरून त्याची आई मरण पावल्याचे सांगितले. त्यावरून प्रफुल्लने तातडीने नातेवाइकांना फोन करून माहिती दिली व घटनास्थळ गाठले.

Wardha Tona  Woman burnt body found
Wardha News : नोटाबंदीपासून वर्धा सहकारी बँकेत ७८ लाखांच्या नोटा तिजोरीतच; आरबीआयकडून निर्णय नसल्याने नोटांची किंमत शून्य

ही घटना गावातील शाळेजवळच्या परिसरात उघडकीस आली. मुलगा प्रफुल्ल शनिवारी घटनास्थळी गेला. त्याने पाहणी केली असता जळालेल्या अवस्थेत आईचा मृतदेह आढळला. एवढी मोठी घटना घडूनही गावातील लोक काही सांगण्यास तयार नव्हते. मृतदेह धरायला किंवा मदत करायला एकही ग्रामस्थ पुढे आला नाही. मुलगा गेला तेव्हा झाड पेटले होते, त्यातून धूर निघत होता, असे प्रफुल्ल यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री थंडीमुळे शेकोटी पेटविली. त्यातच महिला जळाली, अशी गावात चर्चा होती. परंतु मुलाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तसे दिसून आले नाही. त्यामुळे हा घातपात आहे, असा आरोप मुलगा प्रफुल्ल काळपांडे व नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन होणार नसल्याने आणि फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवायचा असल्याने मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात दुपारी पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Wardha Tona  Woman burnt body found
Nitin Chauhaan: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याचं निधन, अवघ्या ३५ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com