Wardha News : बाब तो बाप रहेगा' इन्स्टाची पोस्ट जीवावर बेतली दोन सख्ख्या दोन भावांकडून मित्राची हत्या

wardha crime : मोबाईलच्या अतिवापरासोबतच तरुणाई ही सोशल मीडियात गुरफटली आहे. लाईकस आणि फॉलोवर्सच्या नादात एकमेकांच्या जिवावर उठले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार हिंगणघाट येथे घडला.
बाप तो बाप रहेगा'ची पोस्ट जीवावर बेतली, सोशल मीडियावरील वादातून युवकाचा खून
बाप तो बाप रहेगा'ची पोस्ट जीवावर बेतली, सोशल मीडियावरील वादातून युवकाचा खूनsaam tv
Published On

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) येथे १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हिमांशू किशोर चिमणे (वय १७, राहणार - संत कबीर वार्ड, हिंगणघाट) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मानव धनराज जुगनाके (वय २१) आणि 'अनिकेत धनराज जुगनाके (वय २२) या दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्टमधून सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत

सुमारे दीड महिन्यापूर्वी हिमांशू आणि मानव यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. एका पोस्टला अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या, तर दुसऱ्याला कमी यावरून दोघांमध्ये वाद झाला. जो हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र, तो तिथेच संपला नाही. काही दिवसांनी हिमांशूने पुन्हा 'बाब तो बाप रहेगा' अशी स्टोरी पोस्ट केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद मिटावा म्हणून हिमांशू स्वतः मानवाच्या घरी गेला. मात्र, तिथे दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या हिमांशूने मानवला चापट मारली.

बाप तो बाप रहेगा'ची पोस्ट जीवावर बेतली, सोशल मीडियावरील वादातून युवकाचा खून
Wardha Nafed Center : नाफेडची सोयाबीन खरेदी बंद; २२ कोटी ९० लाख रुपयाचे चुकारे नाफेडकडे थकीत

वाद मिटावा म्हणून हिमांशू स्वतः मानवाच्या घरी गेला. मात्र, तिथे दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. यावेळी संतप्त झालेल्या हिमांशूने मानवला चापट मारली. त्यानंतर वाद अधिकच चिघळला. हा वाद सोडवण्यासाठी मानवचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला.त्यावेळी हिमांशूने जवळ असलेले धारधार शस्त्र काढून मानववर सपासप वार केले. मानववर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अनिकेतनेही हस्तक्षेप केला.

त्यानंतर दोघांनीच हिमांशूच्या मानेवर व छातीवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या हिमांशूचा जागीच मृत्यू झाला.या हाणामारीत आरोपी अनिकेत जुगनाके देखील गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला वर्धा येथे हलवण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे हिंगणघाट परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बाप तो बाप रहेगा'ची पोस्ट जीवावर बेतली, सोशल मीडियावरील वादातून युवकाचा खून
Wardha News : शिक्षकांची फ्री स्टाईल, नंतर विद्यार्थ्यांना बदडले; बोपापूर जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com